Saisimran Ghashi
सध्या तिरूपती बालाजी लाडू प्रसादाचा विवाद सुरू आहे.
या प्रसादामध्ये हानिकारक पदार्थ असल्याचे स्पष्ट झाल्याने भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
पण तुम्हाला माहिती आहे काय काही वर्षांपूर्वी शिर्डी साईबाबांच्या मंदिरात तयार केलेले हजारो किलो लाडू प्रसादाबद्दल देखील विवाद झाला होता.
2012 मध्ये शिर्डी साई बाबांच्या लाडू प्रसादामध्ये भेसळ असल्याचे आरोप झाले होते.
तेव्हा तिरूपतीच्या भक्तांच्या प्रमाणेच साई बाबांच्या भक्तांनी तुपाच्या शुद्धतेवर प्रश्न उपस्थित केला होता.
भक्तांनी असा आरोप केला होता की लाडू प्रसदामध्ये भेसळ आहे आणि त्याची चव कुबट,कडू आहे.
बिजनेस स्टँडर्डच्या एका रीपोर्टच्या अनुसार प्रसाद कुबट,कडू असल्याचा आरोप केला होता.
तक्रार झाल्यानंतर फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने (FDA) साईबाबा मंदिराच्या स्वयंपाकघरात छापा टाकून तुपाचे नमुने घेतले होते.
तपासात काय निष्पन्न झाले ते कळू शकले नसले तरी त्यावेळी 8.15 लाख रुपये किमतीचे 6796 किलो लाडू नष्ट करण्यात आले.