Chinmay Jagtap
मराठ्यांचा इतिहास गौरव शाली आहे. त्यात मराठ्यांची शौर्य गाथा तर संपूर्ण जगाला ज्ञात आहे
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांना लढायाचं कसं ते शिकवलं. आणि यानंतर मराठ्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.
अफजलखानाच्या स्वारीवेळी शिवाजी महाराजांसोबत उभे असलेल्या जीवा महाला यांनी सय्यद बंडा याचा हात कापला होता
पावन खिंडीमध्ये बाजी प्रभू देशपांडे यांनी खिंड लढवत छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप विशाळगडावर पाठवलं होतं
या दोन्ही लढायांमध्ये मराठ्यांकडे एक शस्त्र होतं त्याचं नाव होतं दांडपट्टा
दांडपट्टा हे अतिशय लवचिक आणि शत्रूंसाठी घातक असे शास्त्र. एकावेळी कित्येक शत्रूंवर या दांडपट्ट्याने वार करता यायचा
याची लांबी पाच फूट तर पात चार फूट असल्याचे म्हटले जाते. याच दांडपट्ट्यांच्या सहाय्याने मराठ्यांनी कित्येक लढाया जिंकल्या