HBD Shivaji Satam: बँक कॅशिअर ते सीआयडीचे एसीपी प्रद्युम्न

आशुतोष मसगौंडे

शिवाजी साटम यांचा आज 21 एप्रिल रोजी 74 वा वाढदिवस आहे. शिवाजी साटम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा प्रवास जाणून घेऊ.

Shivaji Satam | ESakal

शिवाजी साटम यांनी बँक एडमिनिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा केला होता. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिवाजी साटम यांनी बँकिंग क्षेत्राची निवड केली होती.

Shivaji Satam | ESakal

शिक्षणानंतर शिवाजी साटम यांना सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कॅशियर म्हणून नोकरी मिळाली.

Shivaji Satam | ESakal

या सरकारी नोकरीच्या काळात शिवाजी साटम यांची भेट मराठी रंगभूमीतील प्रसिद्ध अभिनेते आणि रामायणातील राजा दशरथची भूमिका करणारे बाळ धुरी यांच्याशी झाली. बाळ धुरी यांनी साटम यांना पहिला ब्रेक दिला.

Shivaji Satam | ESakal

यानंतर शिवाजी साटम यांनी 1988 मध्ये 'पेस्टनजी' चित्रपटातून हिंदीत अभिनयाची सुरुवात केली. या चित्रपटात शिवाजी साटम यांनी सर्वाधिक सात वेळा पोलिसाची भूमिका साकारली होती.

Shivaji Satam | ESakal

Shivaji Satamशिवाजी साटम यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. या अभिनेत्याने 'गुलाम-ए-मुस्तफा', 'यशवंत', 'चायना गेट', 'टॅक्सी नंबर 9211', 'नायक', 'जिस देश में गंगा रहता है', 'सूर्यवंशम' आणि 'असे अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Shivaji Satam | ESakal

पुढे 1998 मध्ये शिवाजी साटम यांना सीआयडीमध्ये भूमिका मिळाली. या शोमध्ये शिवाजी साटम यांनी सीआयडीमध्ये आपल्या दमदार अभिनयाने आपले नाव जगभर गाजवले. अभिनयासोबतच शिवाजी साटम चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मितीही करतात.

Shivaji Satam | ESakal

'परी म्हणू की सुंदरा'..! माधुरीचा मनमोहक अंदाज

Madhuri Dixit Saree Look | Sakal
अधिक पाहाण्यासाठी...