Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धा सुरु असून आता रोमांचक वळणावर स्पर्धा आली आहे.
आयपीएलच्या या 17 व्या हंगामात अनेक खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे, यामध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या शिवम दुबेचाही समावेश आहे.
दुबेने चेन्नईकडून आयपीएल खेळण्याचे हे तिसरे वर्ष आहे. दरम्यान, चेन्नईकडून खेळताना त्याचा स्ट्राईक रेट तिन्ही वर्षात 150 पेक्षा जास्त आहे.
दुबेने 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो या संघाकडू दोन हंगाम खेळला.
दुबेने बेंगळुरूकडून 2019 मध्ये 4 सामन्यांत 121.21 च्या स्ट्राईक रेटने 40 धावा केल्या होत्या, तर 2020 मध्ये 11 सामन्यांत 122.85 च्या स्ट्राईक रेटने 129 धावा केल्या होत्या.
त्यानंतर 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दुबेने 9 सामन्यांत 119 च्या स्ट्राईक रेटने 230 धावा केल्या होत्या.
यानंतर 2022 पासून दुबे चन्नईकडून खेळत आहे. त्याने 2022 मध्ये 11 सामन्यांत 156.22 च्या स्ट्राईक रेटने 289 धावा केल्या होत्या. तसेच 2023 मध्ये 16 सामन्यांत त्याने 158.33 च्या स्ट्राईक रेटने 418 धावा केल्या होत्या.
दुबेने आयपीएल 2024 मध्ये आत्तापर्यंत (1 मे) 10 सामन्यांत 171.57 च्या स्ट्राईक रेटने 350 धावा केल्या आहेत.