राहुल देव साकारणार 'ही' भूमिका

priyanka kulkarni

प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

शिवरायांचा छावा या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट 16 फेब्रुवारीला रिलीज होत आहे.

shivrayancha chhava

दिग्पाल लांजेकरांचा चित्रपट

छावा या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

shivrayancha chhava

भूषण पाटील साकारणार भूमिका

शिवरायांचा छावा या चित्रपटामध्ये भूषण पाटील हा संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

shivrayancha chhava

‘काकर खान’ ची भूमिका

अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये खलनायक म्हणून झळकलेले अभिनेते राहुल देव आता आगामी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात ‘काकर खान’ ही खलनायकी व्यक्त्तिरेखा साकारणार आहे.

rahul dev

कोण होता काकर खान?

औरंगजेबाने बुऱ्हाणपूरची पूर्ण जबाबदारी काकर खान या अनुभवी सरदारावर सोपविली होती. लोकांवर जिझिया कर लावत काकर खानने जनतेस वेठीस धरले होते.

rahul dev

काकर खानची अन्यायी राजवट

काकर खानच्या अन्यायी राजवटीपासून छत्रपती संभाजी महाराजांनी रयतेची सुटका केली होती.

rahul dev

विशेष मेहनत

आपल्या या भूमिकेविषयी बोलताना राहुल देव म्हणाला की, ‘आजवरच्या अभिनय कारकिर्दीत अनेक खलनायकी भूमिका साकारल्या असल्या तरी क्रूरकर्मा ‘काकर खान’ ही ऐतिहासिक भूमिका करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.'

rahul dev

उर्दू भाषा आत्मसात केली

'एखादी विशेष भूमिका वठवताना अगदी भाषेपासून चालण्या बोलण्याच्या सवयी पर्यंतचे बदल करावे लागतात. काकरखान खानची भूमिका असल्याने उर्दू भाषा आत्मसात करणं मला गरजेचं होत.', असंही राहुलनं सांगितलं.

rahul dev

देहबोली

"प्रत्येक भाषेचा स्वत:चा असा लहेजा असतो, तो लहेजा लक्षात घेत ही भाषा मी शिकून घेतली. भाषेनंतर प्रश्न होता तो लुक्सचा. त्यामुळे देहबोलीही तितकीच बोलकी असण्याची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर होती. ती मी माझ्या अभिनयातून केली", असंही राहुल म्हणाला.

rahul dev

समंथा प्रभूने केली तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samantha Prabhu
येथे क्लिक करा