सकाळ डिजिटल टीम
सध्या मुंबई, पुण्यासह डेंगीच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
डेंगीच्या आजारात रुग्णांच्या पेशी म्हणजेच प्लेटलेट्स कमी होतात.
बरेचसे डॉक्टर अशा वेळी किवी खाण्याचा सल्ला देतात.
पेशी वाढवण्यासाठी क जीवनसत्त्व हे महत्त्वाचे असते.
किवीपेक्षा जास्त जीवनसत्त्व क हे आवळा, पेरूत आहे. किवी हे महाग असल्याने सर्वांनाच ते परवडत नाही.
जर्नल ऑफ फूड अँड न्यूट्रिशनल सायन्समध्ये रिसर्च प्रसिद्ध झाला आहे.
पुण्यातील विश्वराज हॉस्पिटलच्या डॉ. स्वाती खारतुडेंनी तुलनात्मक अभ्यास केला.
१०० रुग्णांवर हे संशोधन करण्यात आले.
यात किवीपेक्षा पेरू खाणाऱ्या रुग्णांच्या पेशीत झपाट्याने वाढ झाली. या रुग्णांना लगेच डिस्चार्ज लवकर झाला.