Sudesh
आपल्याकडे ट्रॅफिकच्या नियंत्रणासाठी ठिकठिकाणी सिग्नल लावलेले असतात.
शहरातील लोकांचा दिवसातील बराच वेळ तर सिग्नलवर ट्रॅफिकमध्येच जातो. लाल सिग्नलचा ग्रीन होण्याची वाट पाहत कित्येक लोक वेळ मोजत राहतात.
अशा वेळी काही जण आपल्या गाडीचं इंजिन सुरू ठेवतात, तर काही लोक भरपूर वेळ आहे पाहून इंजिन बंद करतात.
गाडीचं इंजिन बंद केल्यामुळे भरपूर इंधन वाचतं, असा काही लोकांचा समज आहे. मात्र हे किती खरं आहे?
तुम्हाला जर असं वाटत असेल, की इंजिन सुरू ठेवल्याने जास्त नुकसान होत; तर ते चुकीचं आहे.
खरंतर सिग्नलला जर तुम्ही एक मिनिट थांबणार असाल; तर गाडीचं इंजिन सुरू ठेवण्यात तुमचा जास्त फायदा आहे.
याला कारण म्हणजे, इंजिन एक मिनिट सुरू ठेवल्यावर जेवढं इंधन वापरलं जातं; त्या तुलनेत इंजिन बंद करून पुन्हा सुरू करण्यासाठी अधिक प्रमाणात इंधन वापरलं जातं.
शिवाय, वारंवार बंद-सुरू केल्यामुळे इंजिनचं आयुष्यही कमी होत जातं. त्यामुळे सिग्नलला इंजिन सुरू ठेवणंच फायद्याचं ठरतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.