Anuradha Vipat
प्रोफेशनल लाईफसोबतच श्रद्धा कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते.
आता श्रद्धाने तिच्या नात्याची कबुली दिली आहे.
श्रद्धा कपूरने नुकतीच एक मुलाखत दिली आहे.
यावेळी श्रद्धाला तिच्या नात्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने अतिशय खुलेपणाने उत्तर दिले.
श्रद्धाने कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र श्रद्धा म्हणाली की, मला माझ्या जोडीदारासोबत वेळ घालवायला आणि सिनेमा बघायला, बाहेर जेवायला किंवा प्रवास करायला आवडते.
पुढे श्रद्धा म्हणाली की, मी एक सामान्य व्यक्ती आहे जिला एकत्र काहीतरी करायला आवडते किंवा एकत्र फिरायला आवडते.
श्रद्धा कपूर सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असते.