Anuradha Vipat
अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाविषयीच्या प्रश्नाचं मजेशीर उत्तर दिलं आहे.
'स्त्री 2' या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान श्रद्धाला लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
आता याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून श्रद्धाचं नाव पटकथालेखक राहुल मोदीशी जोडलं जातं आहे
श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये राहुलसोबतचा फोटो पोस्ट करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.
श्रद्धा तु नवरी कधी होणार असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.
त्यावर ती म्हणाली, वो स्त्री है, उसे जब दुल्हन बनना है वो बनेगी. श्रद्धाचं हे उत्तर ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.