Monika Lonkar –Kumbhar
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री 'स्त्री' फेम श्रद्धा कपूर
श्रद्धा कपूर तिच्या उल्लेखनीय अभिनयासाठी आणि नृत्य कौशल्यासाठी खास करून ओळखली जाते.
श्रद्धा तिच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी एका फेसपॅकचा वापर प्रामुख्याने करते.
एका मुलाखतीमध्ये बोलताना तिने या फेसपॅकविषयी सांगितले आहे. कोणता आहे तो फेसपॅक? चला तर मग जाणून घेऊयात.
एका बाऊलमध्ये २ चमचे बेसनपीठ घ्या. बेसनामुळे त्वचेचे छान पोषण होते.
या बेसनपीठामध्ये आता १ चमचा दही मिसळा.
बेसनपीठ आणि दही मिसळल्यानंतर त्यात १ चमचा हळद आणि गुलाबजल मिसळून त्याची पेस्ट तयार करून घ्या.
आता हा बेसन-हळीदाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका.