Monika Lonkar –Kumbhar
दक्षिण भारतीय पंचांगानुसार महाराष्ट्रात श्रावण महिना ५ ऑगस्टपासून (सोमवार) सुरू होणार आहे.
श्रावण महिन्याला हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्व आहे.
भगवान शंकरांना श्रावण महिना प्रिय असून श्रावणात प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते.
श्रावणी सोमवाराल महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक करताना कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या? जाणून घेऊयात.
श्रावणी सोमवारी शिवलिंगावर पाणी आणि गंगाजलचा अभिषेक करावा.
त्यानंतर, शिवलिंगावर दूधाचा अभिषेक करावा.
दूधाचा अभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर मध आणि दह्याचा अभिषेक करावा.
तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवलिंगावर बेलपत्र अवश्य वाहावे.