Monika Lonkar –Kumbhar
श्रावण हा महिना हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानला जातो.
भगवान शंकरांना हा महिना समर्पित असून या महिन्यात त्यांची विशेष पूजा केली जाते.
या दिवसांमध्ये अनेक जण श्रावणी सोमवारचे उपवास करतात. हे उपवास करताना आरोग्याची काळजी कशी घ्यायची? चला तर मग जाणून घेऊयात.
श्रावणात उपवासाचे जड पदार्थ खाण्याऐवजी ताजी फळे खा. यामुळे, तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि आरोग्य निरोगी राहील.
श्रावणात पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढते. त्यामुळे, डिहायड्रेशन होऊ शकते. यासाठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.
श्रावणी सोमवारच्या उपवासाचे व्रत करताना अधिक काम करणे टाळावे. पुरेशी विश्रांती घ्यावी.
श्रावणात उपवासाचे पदार्थ मर्यादित प्रमाणात खा. अन्यथा तुम्हाला पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.