Monika Lonkar –Kumbhar
श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे.
श्रावणात महादेव आणि देवी पार्वती यांची विशेष पूजा केली जाते.
श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविक महादेवांची आवर्जून पूजा, आराधना करतात आणि शिवलिंगावर शिवामूठ वाहतात.
प्रत्येक सोमवारी महादेवाला मूठभर धान्य वाहण्याची परंपरा आहे. याला आपण शिवामूठ असे म्हणतो.
शिवामूठ हा श्रावणातील सर्वात मोठा वसा आहे. हा वसा सूवासिनी आवर्जून पाळतात.
आजच्या तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर हिरव्या मूगाची शिवामूठ वाहायची आहे.
श्रावणातील शिवामूठचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये करण्यात आला आहे.