धनश्री भावसार-बगाडे
श्रावण महिन्यात शंकराची पूजा केली जाते. या पूजेच्यावेळी काही श्लोक म्हटल्याने उत्तम फळं मिळू शकतात.
चातुर्मासात भगवान विष्णू चार महिने आराम करतात, त्यावेळी भगवान शंकर जगाचे पालन करतात असे मानले जाते. याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण असतो.
हा महिना शंकराचा आवडता महिना मानला जातो. याकाळात अनेक व्रतवैकल्ये केले जाते.
सोरटी सोमनाथ, श्रीशैल, महाकालेश्वर, ओंकारमांधाता, परळी वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, औढ्या नागनाथ, काशी विश्वनाथ, त्रंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत.
याशिवाय नेपाळ येथी पशुपतीनाथ हेही यातील आहे. परंतु हिमालयातील केदार आणि नेपाळ येथील पशुपतीनाथ हे दोन्ही मिळून एक ज्योतिर्लिंग धरले जाते.
ज्योती म्हणजे प्रकाश, तेज, ज्ञान, प्रेरणा आणि चेतना. ही बारा ज्योतिर्लिंगे भारताच्या पूर्व पश्चिम, दक्षिण उत्तर भागात आहेत.
अनेकतेत एकतेचे प्रतिक देणारी संस्कृती दाखवणारी ही ज्योतिर्लिंग आहेत. देशाच्या सर्व भाषांचे भाविक येथे दर्शनासाठी येतात.
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् । उज्जयिन्यां महाकालम् ॐकारममलेश्वरम् ॥१॥
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम् । सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे। हिमालये तु केदारम् घुश्मेशं च शिवालये ॥३॥
एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.