पुजा बोनकिले
धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात महादेवासोबत गणपतीची पूजा करणे शुभ मानले जाते.
श्रावणातील विनायक चतुर्थीला बाप्पाची मनोभावे पूजा करून उपवास केल्यास मनोकामना पुर्ण होतात.
यंदा ८ ऑगस्टला श्रावण विनायक चतुर्थी साजरी केली जाणार आहे.
श्रावण विनायक चतुर्थीला बाप्पाला कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या हे जाणून घेऊया.
गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय आहे. श्रावण विनायक चतुर्थीला दुर्वा अर्पण केल्यास बाप्पा प्रसन्न होतात.
श्रावण विनायक चतुर्थीनिमित्त बाप्पाला मोदक अर्पण करावे.
बाप्पाला जास्वंदाचे लाल फुल खुप प्रिय आहे. श्रावण विनायक चतुर्थीला हे फुल अर्पण करावे.
'ऊँ गं गणपतये नम:' या मंत्राचा जप केल्याने सर्व संकटे दूर होतात.