श्रेयस अय्यर IPL जिंकणारा आठवा कर्णधार; पाहा संपूर्ण लिस्ट

Pranali Kodre

कोलकाता नाईट रायडर्सचा विजय

कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात कोलकाताने सनरायझर्स हैदराबादला 8 विकेट्सने पराभूत केले.

KKR | Sakal

श्रेयस अय्यर

त्यामुळे श्रेयस अय्यर आयपीएल ट्रॉफी जिंकणारा आठवा कर्णधार ठरला आहे.

Shreyas Iyer | Sakal

अव्वल क्रमांक

आयपीएलचे कर्णधार म्हणून सर्वाधिकवेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांच्या नावावर आहे. दोघांनीही प्रत्येकी 5 वेळा हा कारनामा केलाय.

MS Dhoni - Rohit Sharma | X/MIPaltan

एमएस धोनी

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 साली चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल जिंकले.

MS Dhoni | X/ChennaiIPL

रोहित शर्मा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली मुंबई इंडियन्सने आयपीएल जिंकले.

Rohit Sharma | X/MIPaltan

गौतम गंभीर

त्यानंतर गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने 2012 आणि 2014 साली आयपीएल जिंकले.

Gautam Gambhir | Sakal

शेन वॉर्न

शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थानने सर्वात पहिल्यांदा 2008 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली.

Rajasthan Royals | X

ऍडम गिलख्रिस्ट

डेक्कन चार्जर्सने 2009 साली ऍडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वात आयपीएल ट्रॉफी विजेतेपदाला गवसणी घातली.

Deccan Chargers 2009 | Sakal

डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने 2016 साली आयपीएल विजेतेपद पटकावले.

Sunrisers Hyderabad 2016 | Sakal

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात 2022 साली गुजरात टायटन्सने आयपीएल विजेतेपद मिळवले.

Hardik Pandya | X

Ravi Shastri: व्यक्ती एक, भूमिका अनेक

Ravi Shastri | X/BCCI
येथे क्लिक करा