SRH विरुद्धचा सामना जिंकून श्रेयसने रचला इतिहास!

Kiran Mahanavar

कोलकाता नाईट रायडर्सने मंगळवारी सनरायझर्स हैदराबादवर आठ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

त्याचबरोबर कर्णधार श्रेयस अय्यरच्या नावावर एक विशेष कामगिरी जमा झाली. कर्णधार म्हणून दोन संघांना अंतिम फेरीत नेणारा तो पहिला कर्णधार ठरला.

यापूर्वी श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत नेले होते.

मात्र, जेतेपदाच्या लढतीत संघाला विजयापर्यंत नेण्यात तो अपयशी ठरला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रकरणात अय्यरने रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीरला मागे टाकले आहे.

या खेळाडूंनी एकाच संघाला एकापेक्षा जास्त वेळा अंतिम फेरीत नेले आहे.

अय्यर हा पाचवा कर्णधार आहे ज्याने एकापेक्षा जास्त वेळा आपल्या संघाला अंतिम फेरीत नेले आहे.

T20 World Cup: अफगाणिस्तानला मिळणार CSKच्या 'या' दिग्गजाचं मार्गदर्शन

MS Dhoni - Dwayne Bravo | Sakal
येथे क्लिक करा