Anuradha Vipat
सध्या कमल हासन यांची मोठी मुलगी श्रुती हासन चर्चेत आहे.
श्रुतीने जवळपास चार वर्षे डेट केल्यानंतर बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केल्याची माहिती समोर आली आहे.
पण त्यांचा ब्रेकअप कोणत्या कारणामुळे झाला याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
श्रुतीने बॉयफ्रेंड शंतनू हजारीकाला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे.
तसेच त्यांनी एकमेकांसोबतचे इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फोटो आणि व्हिडीओ डिलिट केल्याचे दिसत आहे.
श्रुतीने ब्रेकअपवर बोलण्याचे टाळले आहे. तिने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.