Anuradha Vipat
अभिनेत्री श्रुती हासनने एका फ्लाइटच्या उशीर होण्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल सोशल मीडियावर नुकतीच नाराजी व्यक्त केली आहे.
श्रुती हासनने ट्वीट करताना सांगितले की, चार तासांच्या विलंबानंतरही एका नामांकित एअरवेज कडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.
श्रुती हासनच्या या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत विमान कंपनीच्या ग्राहक सेवेबाबत नाराजी व्यक्त केली आहे
यानंतर आता श्रुती हासनच्या ट्वीटला उत्तर देताना विमान कंपनीने म्हटले आहे की, “मॅडम हासन, फ्लाइटच्या विलंबामुळे झालेल्या गैरसोईबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत.
पुढे विमान कंपनीने म्हटले आहे की, आम्हाला समजते की इतका वेळ वाट पाहणे खूप त्रासदायक असते. हा विलंब मुंबईतील हवामानामुळे झाला आहे; ज्याचा परिणाम विमानाच्या आगमनावर होत आहे.
पुढे विमान कंपनीने म्हटले आहे की, आम्हाला आशा आहे की, आपण हे समजून घ्याल
पुढे विमान कंपनीने म्हटले आहे की, ही परिस्थिती आमच्या नियंत्रणाबाहेर आहे आणि आमचे विमानतळावरील कर्मचारी आपल्या सोय आणि मदतीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत