Swadesh Ghanekar
गौतम गंभीर याची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून दणक्यात सुरुवात झाली आहे.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रमवारीत आघाडीवर असलेल्या सूर्यकुमार यादवची पूर्णवेळ कर्णधार म्हणूनही चांगली सुरूवात झाली आहे.
भारतीय संघाने युवा खेळाडूंच्या साथीने यजमान श्रीलंकेला पहिल्या दोन सामन्यांत पराभूत करून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत उप कर्णधार शुभमन गिल याच्याजागी संजू सॅमसनला संधी मिळाली, परंतु तो भोपळ्यावर बाद झाला.
मानेच्या दुखापतीमुळे शुभमन गिलने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातून माघार घेतली होती.
शुभमन गिल आज होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.
उप कर्णधार शुभमन गिलने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यांत १६ चेंडूंत ३४ धावा केल्या होत्या.
ट्वेंटी-२० मालिकेनंतर भारत-श्रीलंका यांच्यात वन डे मालिका होणार आहे. यात शुभमन खेळेल की नाही, हेही निश्चित नाही..
२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर कोलंबोत दाखल.