Anuradha Vipat
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला विचारलं की, लग्नानंतर तुझ्यात काय बदल झाले?
यावर सिद्धार्थ म्हणाला, “माझ्या कपाटाच्या साइजमध्ये खूप बदल घडलेला आहे. तसंच मी आधी सतत काळजी, चिंता करणारा माणूस होतो. तर आता ते माझं सतत चिंता करण्याचं प्रमाण कमी झालंय.
पुढे सिद्धार्थ म्हणाला शांतता आली असं वाटतंय. याशिवाय मी माझ्या लग्नानंतर कामाकडे जास्त लक्ष देऊ लागलो. मिताली माझ्या करिअरसाठी अत्यंत लकी ठरली.
लग्नानंतर ही माझ्यात शक्ती आली आहे,” असंही सिद्धार्थ म्हणाला.
४ जानेवारी २०२१ मोठ्या थाटामाटात सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा पार पडला होता.