सकाळ डिजिटल टीम
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ मधील पॅडी कांबळे यांच्याबद्दल जान्हवी किल्लेकरने केलेलं वादग्रस्त वक्तव्य सध्या गाजत आहे.
२ ० ऑगस्टच्या एपिसोड मध्ये एका भांडणादरम्यान जान्हवी पॅडी यांना Overacting करता असं म्हणाली. यावरून संपूर्ण सिनेसृष्टी तिच्यावर नाराज झाली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर याचा निषेध व्यक्त केला.
पंढरीनाथ यांनी स्वतः जरी संयम बाळगला असला तरीही प्रेक्षक आणि कलाकारांना याबाबत वाईट वाटलं आहे.
अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहीत त्याचा संताप व्यक्त केला. जान्हवीला खडेबोल सुनावणारी पोस्ट सिद्धार्थने केली.
सिद्धार्थ म्हणाला कि,""...जोकर "...बर मग... Overacting...बरं मग..पण या overacting करणार्या जोकर चा "संयम" दिसत नाही का तूला... एकदा का "तो" सुटला की तुझी bbmarathi मधली overreacting वाली jokergiri पण दिसणार नाही...याला म्हणतात "अनुभव" तुझ्यासारखी कितीही (जा )नवी लोकं आली ना..तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव...जुनं तेच सोनं ...आणि माझा भाऊ प्रेमाने जग जिंकणारा आहे... ""
तर निर्माते अमेय खोपकर यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जान्हवीवर टीका केली आणि पॅडी यांना सपोर्ट केला.
"पॅडी, तुझा प्रवास आणि तुझा संधर्ष आम्ही सर्वांनी खूप जवळून पाहिलाय. नेहमीच खळखळून हसवलंस आम्हाला सगळ्यांना… आताही बिग बॉस मध्ये शांत डोकं ठेवून तू जी धमाल करतोयस ती आम्ही मस्त एंजॉय करतोय. जान्हवीसारख्या चिल्लर सदस्यांच्या कलकलाटाकडे लक्ष द्यायची गरजच नाही. तू बिनधास्त लढ, आम्ही आहोत तुला फायनलपर्यंत घेऊन जायला" अशी पोस्ट केली.
एकूणच पॅडी यांच्या पाठीशी संपूर्ण मराठी इंडस्ट्री उभी राहिली आहे. आता जान्हवीच्या वागण्यावर बिग बॉस काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.