Saisimran Ghashi
रोज जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे शरीरासाठी केसांसाठी धोकादायक ठरू शकते. त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत.
गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी करून त्वचा कोरडी आणि खाज सुटण्याची समस्या निर्माण करते.
गरम पाण्यामुळे त्वचा संवेदनशील होते, ज्यामुळे त्वचा लाल होणे, सूज येणे आणि अल्कॅलाइन वातावरण निर्माण होऊ शकते.
जास्त गरम पाणी त्वचेच्या या विकारांना अधिक वाढवू शकते.
गरम पाणी केसांच्या क्युटिकलला नुकसान पोहोचवते, ज्यामुळे केस कोरडे, खराब होतात.
गरम पाणी शरीराचे तापमान वाढवते, ज्यामुळे थकवा आणि निद्रानाश होऊ शकतो.
त्वचेच्या आरोग्यासाठी कोमट पाणी सर्वात उत्तम असते,असे वेलनेस तज्ज्ञ डॉ. जॅकलिन शेफर, एमडी यांचे म्हणणे आहे.
लहान बाळांना लवकर झोप यावी,थकवा दूर व्हावा यासाठी जास्त गरम पाण्याने आंघोळ घालणे धोक्याचे ठरू शकते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. आरोग्य विषयक बदल करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.