Saisimran Ghashi
आजच्या धावपळीच्या जगात जेवण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे कठीण झाले आहे.
घाईत असताना आपण अन्न चांगले चावत नाही, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते.
अशा प्रकारे जेवल्याने पचनसंस्थेवर ताण येतो आणि अपचन, गॅस आणि अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकतात.
घाईत जेवल्याने आपण जास्त प्रमाणात खातो, कारण मेंदूला पोट भरले आहे असा संदेश मिळण्यासाठी वेळ लागतो.
घाईत जेवल्याने अन्नपदार्थातील पोषक तत्वांचे शोषण पूर्णपणे होत नाही.
घाईत जेवल्याने शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही, ज्यामुळे आळस आणि थकवा वाटतो.
वेळ काढून जेवा,जेवणासाठी पुरेसा वेळ द्या.फळे, भाज्या, धान्ये यांचा समावेश तुमच्या आहारात करा.
ही केवळ सामान्य माहिती आहे,आम्ही याची पुष्टी करत नाही. आरोग्यासंबंधित सल्ला घेण्यासाठी डॉक्टरना भेटा.