Aishwarya Musale
गुलाबी थंडीचा असा हिवाळा हा महिना सुरु झाला आहे. इतर ऋतूंच्या मानाने हिवाळा ऋतू हा तसा आळशी ऋतू मानला जातो. कारण, या ऋतूत आपल्याला सर्वात जास्त झोप लागते. तसेच, थंडीत भूकही जास्त लागते.
असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्यासाठी लोक हिवाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. यापैकीच एक म्हणजे मेथी. उत्तर भारतातील बहुतांश भागात लोक मेथी खूप आवडीने खातात.
पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, शरीरासाठी उत्त्म मानली जाणारी मेथी तुमच्या आरोग्याचं नुकसानही करू शकते.
तज्ज्ञांच्या मते, मेथीचे दाणे किंवा हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात घेतल्यास साखरेची पातळी झपाट्याने खाली जाऊ शकते. खरंतर, मेथीतील पोषक घटक रक्तातील साखर कमी करतात.
मेथी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. कारण मेथी जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील सोडियमची पातळी कमी होते. त्यामुळे जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर मेथीसारख्या पदार्थांचे सेवन टाळा.
मेथी गरम असते असे बहुतेक लोक मानतात, त्यामुळे गर्भधारणेदरम्यान त्याचे सेवन टाळावे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गरोदरपणात याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्त गोठण्याची समस्या देखील होऊ शकते.
जर कोणाला पचनाचा त्रास असेल तर त्यांनी मेथीची भाजीही खाऊ नये. कारण त्यामुळे अधिक गॅस तयार होतो. याशिवाय भाजी बनवताना हिरव्या मिरच्यांचा वापर केला जातो.
ज्यांना अनेकदा अॅसिडिटीचा त्रास होतो त्यांनी अशा भाज्यांपासून दूर राहावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.