सकाळ डिजिटल टीम
आजकाल तरूणाई बदलत्या लाईफस्टाईलमुळे केवळ सहा तासांपेक्षा कमी झोप घेतात.
योग्य झोप न झाल्यामुळे चिडचिड, भूक न लागणे, डोकं दुखणे, कामात लक्ष न लागणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
सहा तासांपेक्षा जेव्हा आपण कमी झोप घेतो तेव्हा त्याचा विपरीत परिणाम आपल्या वजनावर होतो. वजन वाढण्यास सुरवात होते.
कमी झोप घेतल्यामुळे मानसिक ताण वाढतो आणि डिप्रेशनचाही सामना करावा लागू शकतो.
कमी झोपेमुळे प्रतिकारशक्ती सुद्धा कमकुवत होते.
एवढंच काय तर अपुऱ्या झोपेमुळे स्मरणशक्ती सुद्धा कमकुवत होते.
सहा तासांपेक्षा कमी झोपल्याने कॉलेस्ट्रॉल वाढू शकते
तर याशिवाय हाय ब्लड प्रेशरचीही समस्या वाढू शकते.
कमी झोप घेतल्यामुळे हार्ट अटॅकचाही धोका वाढू शकतो.
त्यामुळे कधीच सहा तासांपेक्षा कमी झोप घेऊ नये. जवळपास सात किंवा आठ तास झोप घेणे कधीही हेल्दी असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.