Pranali Kodre
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान पार पडला.
या स्पर्धेत १० हजार खेळाडू वेगवेगळ्या खेळात सहभागी झाले होते. यातील काही खेळाडूंनी अफलातून विक्रम केले.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी नेदरलँड्सच्या सिफान हसनने मॅरेथॉन जिंकून मोठा विक्रम केला आहे.
धावपटू सिफानने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५००० मीटर, १०००० मीटर आणि मॅरेथॉन या तीन प्रकारात पदक जिंकले आहे.
तिने मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक जिंकले, तर ५००० मीटर आणि १०००० मीटर या प्रकारांमध्ये कांस्य पदक जिंकले आहे.
त्यामुळे ती ५००० मीटर, १०००० मीटर आणि मॅरेथॉन या तीन प्रकारात एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी केवळ दुसरी खेळाडू ठरली आहे.
यापूर्वी, या तीन प्रकारात १९५२ साली एमिल झॅटोपेक या खेळाडूने सुवर्णपदके जिंकली होती. असे पराक्रम करणारा तो पहिला खेळाडू होता.