कार्तिक पुजारी
३२ विधानसभेच्या जागा असणाऱ्या सिक्किममध्ये मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्या सिक्किम क्रांतिकारी मोर्चाने मोठा विजय मिळवला आहे
२०१३ मध्ये बंडखोरी करत त्यांनी सिक्किम क्रांतिकारी पक्षाची स्थापना केली. पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांना २०१४ मध्ये १० जागा मिळाल्या होत्या.
नेपाळी भाषिक आई-वडिलांच्या पोटी तमांग यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९६८ साली झाला आहे. ते एका सरकारी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते.
समाजसेवेसाठी त्यांनी तीन वर्षानंतर सरकारी नोकरी सोडली अन् ते एसडीएफ पक्षात आले. १९९४ पासून ते सलग विधानसभा सदस्य आहेत
१९९४ आणि १९९९ मध्ये सरकारी पैशांची हेराफेरी केल्याप्रकरणी २०१६ मध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलं. शिवाय त्याचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले.
त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती, पण कोर्टाने निकाल कायम ठेवल्याने त्यांना तुरुंगात जावं लागलं.
२०१८ मध्ये ते तुरुंगातून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी विजयी घोडदौड सुरु ठेवली आणि २०१९ मध्ये ते मुख्यमंत्री झाले.