Silver jewellery : चांदीचे दागिने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

Monika Lonkar –Kumbhar

दागिने

महिलांना दागिन्यांचे विशेष आकर्षण असते. मग, हे दागिने कोणत्या ही प्रकारचे असुदे, ते सोन्याचे असो, चांदीचे असो किंवा मग इमिटेशन ज्वेलरी असो. 

सोन्याचे दागिने

दागिन्यांमध्ये आजकाल असंख्य ऑप्शन जरी उपलब्ध असले तरी, देखील महिलांचा कल हा प्रामुख्याने सोन्याचे आणि चांदीचे दागिने खरेदी करण्यावर असतो. 

चांदीचे दागिने

आजकाल चांदीच्या दागिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हरायटी पहायला मिळत आहे. शिवाय, अनेक नवनवीन डिझाईन्समुळे महिलांची चांदीच्या दागिन्यांना पसंती वाढली आहे.

परंतु, चांदीचे दागिने खरेदी करताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. 

क्वालिटी चेक करायला विसरू नका

चांदीचे दागिने खरेदी करताना त्याची गुणवत्ता बारकाईने तपासा. जर या दागिन्यांची कारागिरी चांगली नसेल तर, तुम्हाला त्या दागिन्याची खडबडीत कडा असमान रचना दिसू शकते. त्यामुळे, चांदीचे दागिने खरेदी करताना या गोष्टी आवर्जून तपासा.

हॉलमार्क अवश्य चेक करा

तुम्हाला माहित आहे का? की, चांदीच्या दागिन्यांवर देखील हॉलमार्क असतो. त्यामुळे, चांदीच्या दागिन्यांवरील हॉलमार्क तपासूनच ते खरेदी करा.

अस्सल चांदीच्या दागिन्यांमध्ये अनेकदा चांदीचे प्रमाण दर्शवणारा हॉलमार्क किंवा स्टॅंम्प असतो.

मानसिक आरोग्यासोबतच उत्तम शारिरीक संतुलनासाठी फायदेशीर सर्वांगासन

Benefits Of Sarvangasana | esakal
येथे क्लिक करा.