सकाळ डिजिटल टीम
आपण तणावात असल्यावर डोके दुखायला लागते आणि काय करावे समजत नाही. अशावेळी हे सोपे उपाय करून पाहा.
दररोज दिवसातून २०-३० मिनिट व्यायाम करावा.
तणावाच्या परिस्थितीत नेहमी गाणी ऐकावीत म्हणजे मन शांत होते.
अशावेळी पाणी प्या आणि स्वत:ला हायड्रेटेड ठेवा.
निरोगी स्नॅक्स खा म्हणजे तुमचा मूड आणि ऊर्जा पातळी स्थिर राहील.
अशावेळी शारीरिक हालचाल गरजेची असते. म्हणून ५-१० मिनिटे चाला.
तणावावेळी थोडा वेळ ध्यान केल्याने मनाला शांती मिळते.
अशावेळी मोबाईलपासून व डिजिटल गोष्टींपासून दूर जावे व नॉन-डिजिटल ॲक्टिव्हिटींमध्ये वेळ घालवावा.