Sudesh
सिम्पल इलेक्ट्रिक कंपनीने आपली Simple Dot One ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे.
या स्कूटरला सहा कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आलं आहे. सिंम्पल वन स्कूटरचं हे परडवणारं व्हर्जन आहे.
या स्कूटरमध्ये 3.7kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 151 किलोमीटर धावू शकते.
यामध्ये 8.5 किलोवॅट क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. 2.77 सेकंदात ही स्कूटर 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडते. याचा टॉप स्पीड 105 Kmph आहे.
यामध्ये चार राईड मोड्स देण्यात आलेले आहेत. दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. याचा ग्राऊंड क्लिअरन्स 164.5mm आहे. तर अंडर सीट स्टोरेज क्षमता 35 लीटर आहे.
यामध्ये एक 7 इंच टच स्क्रीन इन्स्ट्रिुमेंट क्लस्टर आहे. एथर आणि ओलाच्या गाड्यांमध्येही हे फीचर नाही. याला मोबाईल कनेक्टिव्हिटीही मिळते.
सिम्पलच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख रुपये (एक्स शोरूम, बंगळुरू) एवढी ठेवण्यात आली आहे.
या गाडीचं प्री-बुकिंग सुरू करण्यात आलं असून, कंपनीच्या वेबसाईटवरुन ही गाडी बुक करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.