Anuradha Vipat
सध्या गायिका आर्या आंबेकरने लिहिलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.
स्वातंत्र्यदिनी आर्याने या पोस्टच्या माध्यमातून आपलं परखड मत व्यक्त केलं आहे.
आजूबाजूला घडणाऱ्या चिंताजनक घटनांविषयी आर्याने भाष्य केलं आहे.
आर्या आंबेकरने लिहिलं आहे की, खूपच चिंताजनक बातम्या वाचनात येत आहेत. पुण्यातील अपघात, कोलकत्ता डॉक्टर प्रकरण, किंवा एका कुटुंबाचे धरणात वाहून जाणे.
पुढे आर्या आंबेकरने लिहिलं आहे की, या घटनांमधील एक सामान्य धागा असा वाटतो की, लोकांनी घाबरणं सोडूनच दिलंय किंवा लोक भिती व्यक्त करायला reluctant आहेत
पुढे आर्या आंबेकरने लिहिलं आहे की, आजकाल भिती आणि anxiety यासारख्या मूलभूत मानवी भावना सुद्धा चुकीच्या प्रकारे दाखवल्या जात आहेत
आर्याच्या चाहत्यांनी या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत