हिरव्या भाज्यांचा ज्युस प्यायल्याने त्वचा बनते चमकदार? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Aishwarya Musale

निरोगी त्वचा

सुंदर आणि निरोगी त्वचा असावी ही प्रत्येकाची इच्छा असते. परंतु त्वचेची काळजी घेणं म्हणजे केवळ बाह्य सौंदर्य उत्पादनं वापरणं इथपर्यंतच मर्यादित नाही.

juice | sakal

हिरव्या भाज्यांचा ज्युस

तर हे पूर्णपणे तुमच्या खाण्यापिण्याशी संबंधित आहे. हिरव्या भाज्यांचा ज्युस प्यायल्याने तुम्हाला चेहऱ्यावर आश्चर्यकारक परिणाम दिसेल. त्यासाठी या हिरव्या भाज्यांचा रस कसा बनवायचा हे पाहूया.

juice | sakal

लागणारे साहित्य

एक काकडी, अंदाजानुसार थोडी कोथिंबीर, पुदिन्याची काही पानं, 1 आवळा, 1/2 टीस्पून - जिरे पावडर, 1/2 टीस्पून - लिंबाचा रस,1 ग्लास - पाणी.

juice | sakal

दोन आठवडे नियमित प्यावा

हे सर्व मिक्सरमध्ये घालून एकजीव करुन घ्यावे आणि तयार रस किमान दोन आठवडे नियमित प्यावा. यामुळे तुमची त्वचा आतून उजळेल.

juice | sakal

फायदेशीर आहे हिरव्या भाज्यांचा रस

भाज्यांच्या रसामध्ये भरपूर जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारु शकतात.

juice | sakal

आरोग्य

त्वचेच्या आरोग्यासाठी पुरेसं हायड्रेशन आवश्यक असतं आणि भाज्यांच्या रसातील पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने त्वचा हायड्रेटेड आणि मऊ राहण्यास मदत होते.

juice | sakal

त्वचा

हिरव्या भाज्यांचा रस प्यायल्याने तुमचं एकंदर आरोग्य सुधारु शकतं. त्वचा देखील त्यामुळे निरोगी राहते.

juice | sakal

रोग प्रतिकारशक्ती

रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी, पचनास मदत करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी देखील हिरव्या भाज्यांचा रस उपयुक्त ठरतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

juice | sakal