Aishwarya Musale
स्किन केअरच्या बाबतीत जेव्हा बोललं जातं तेव्हा सर्वात आधी मुलींचा विचार येतो. तर, मुलांना कोणत्याच स्किन केअरची गरज नाही असं वाटतं. तुम्हीही असा विचार करत असाल तर हा तुमचा गैरसमज आहे.
वाढतं प्रदूषण आणि बिघडलेली जीवनशैली या कारणांमुळे मुलांच्या चेहऱ्यावर परिणाम होतो. तुमच्या त्वचेचं हे नुकसान भरून काढण्यासाठी तुम्ही स्किन केअर रूटीन फॉलो करणं गरजेचं आहे.
सनस्क्रिनचा वापर न केल्यामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते. यामुळे सनबर्न सारख्या समस्या उद्भवू शकतात. यासाठी सर्वांनी सनस्क्रिन लावणं गरजेचं आहे.
फेसवॉश केल्यानंतर तुमच्या त्वचेला मॉईश्चराईझ करणं खूप आवश्यक आहे. त्वचेला मॉईश्चरायझर न लावल्याने तुमची त्वचा कोरडी पडते.
तुम्हाला जर तुमची त्वचा सॉफ्ट हवी असेल तर त्वचेवर रोज सकाळी फेसवॉश केल्यानंतर मॉईश्चरायझर करणं गरजेचं आहे.
पिंपल्सचा त्रास हा फक्त मुलींनाच नाही तर मुलांनाही असतो. काही मुलं पिंपल्स आल्यानंतर त्यांना फोडतात. यामुळे चेहऱ्यावर काळे डाग दिसू लागतात. तुमची त्वचा खराब होण्यामागे हे एक मुख्य कारण आहे.
मुलांनी शेव करताना कधीही घाई करू नये. असं केल्याने तुमची त्वचा लाल होऊन खाज सुटू शकते.
कोणतीही क्रिम किंवा फेसवॉश चेहऱ्यावर लावण्याआधी त्यात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी एकदा नीट चेक करा. जास्त केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.