टोमॅटोचा चेहऱ्यावर अशा प्रकारे करा वापर! Skin Care

Aishwarya Musale

मुरुम

त्वचेची नीट काळजी घेतली तर मुरुम बरे होतात, पण त्याचे डाग त्वचेवर राहतात. त्याचबरोबर चेहऱ्याचे सौंदर्य बिघडविण्याचे काम मुरुमांच्या खुणा करतात.

skin | sakal

टोमॅटो

चेहऱ्यावरील मुरुमांच्या खुणांमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही कारण टोमॅटो तुम्हाला या समस्येवर मात करण्यास मदत करेल.

skin | sakal

टोमॅटोचा रस

मुरुमांचे डाग दूर करण्यासाठी तुम्ही टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी टोमॅटोचा रस कापसाच्या साहाय्याने संपूर्ण चेहऱ्यावर लावा, हलक्या हातांनी चेहऱ्यावर 5 मिनिटे मसाज करा.

skin | sakal

टोमॅटो आणि दही

जर तुम्ही टोमॅटोमध्ये दही मिसळून चेहऱ्यावर लावला तर यामुळे तुमचे डाग दूर होतील. कारण दहीमध्ये लॅक्टिक अॅसिड आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात

tomatoes | sakal

टोमॅटोचा पल्प

जे त्वचेला खोलवर स्वच्छ करतात. ते वापरण्यासाठी एका वाटीत २ चमचे टोमॅटोचा पल्प घ्या, आता त्यात २ चमचे दही आणि एक चमचा लिंबाचा रस घाला.

tomatoes | sakal

चेहरा पाण्याने धुवून टाका

या सर्व गोष्टी नीट मिक्स करा, आता १५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवून टाका. असे केल्याने चेहऱ्यावरील काळ्या खुणा दूर होतील.

tomatoes | sakal

टोमॅटो आणि मध

मधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे ते चेहऱ्यावर मुरुम बाहेर पडण्यापासून रोखते आणि त्यांचे डाग कमी करण्याचे काम करते.

skin | sakal

फेसपॅक

त्यामुळे टोमॅटो आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावू शकता. त्यासाठी एक वाटी घेऊन त्यात एक चमचा मध घालून हा पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा आणि नंतर पाण्याने चेहरा धुवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

skin | sakal