सुंदर, चमकदार त्वचा हवीये? मग कारल्यापासून बनवलेला हा फेस पॅक ट्राय करा

Aishwarya Musale

कारले

कारले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारल्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात. कारल्यामध्येच नव्हे तर त्याच्या बियांमध्येही अनेक फायदे दडलेले आहेत.

फेस पॅक

कारल्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि खनिजे आढळतात. याच्या बिया बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने डाग काही दिवसातच निघून जातात. आपण कारल्याच्या बियांचा फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घेणार आहोत.

मध

कारल्याच्या बियांचा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे कारल्याच्या बिया, 1 चमचा मध आणि 1 चमचा दही लागेल. प्रथम हे बिया चांगले धुवा. त्यानंतर ते बारीक करून घ्या. यानंतर त्यात मध आणि थोडं दही घालून मिक्स करा.

मुलायम त्वचा

आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 20 मिनिटे राहू द्या. काही वेळानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा फेस पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा. अशा प्रकारे तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार होईल.

व्हिटॅमिन ई

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही हा पॅक स्टोअर करू शकता. कारल्याच्या बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन ई तुमची त्वचा हायड्रेट ठेवते.

अँटिऑक्सिडंट्स

बियांमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेच्या पेशींना फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवण्यास मदत करतात. हे वृद्धत्व देखील प्रतिबंधित करते.

फेस पॅक

कारल्याच्या बियापासून बनवलेला फेस पॅक तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करेल.

त्वचा सुंदर होईल

हा फेसपॅक लावल्याने तुमची त्वचा सुंदर होईल. इतकेच नाही तर कारल्याच्या बिया त्वचेच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.