त्वचेसाठी डार्क चॉकलेट आहे फायदेशीर...

Aishwarya Musale

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे फ्री रॅडिकल्सशी लढून आपली त्वचा निरोगी ठेवतात.

त्वचा हायड्रेट राहते

यामुळे त्वचेचा रंगही सुधारतो आणि ती चमकदार बनते. याशिवाय ते त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. 

डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे

डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे सर्वांनाच माहित आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की ते चेहऱ्यावर लावल्यानेही अनेक फायदे होतात.

डार्क चॉकलेटचा फेसपॅक त्वचेसाठी गुणकारी मानलं जातं. हा फेसपॅक लावल्यास सनटॅन दूर होण्यास मदत होते.

डार्क चॉकलेटचा फेसपॅक त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतं. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही हा फेसपॅक वापरू शकता.   

डार्क चॉकलेटमध्ये कॅफेनचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावल्याने सुरकुत्या कमी होऊन चेहरा उजळण्यास मदत होते.

चेहऱ्यावर चमक येण्याकरता तसंच मुरुमांच्या समस्येवर हा फेसपॅक फायदेशीर आहे. दुधात डार्क चॉकलेट पावडर मिसळून चेहऱ्याला लावल्यास त्वचा मुलायम होते.

दह्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड मुबलक असतं, दही आणि डार्क चॉकलेट पावडर एकत्र करून लावल्याने मृतपेशी दूर होतात. 

हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर खा या भाज्या...

येथे क्लिक करा