Aishwarya Musale
भरपूर लोकं झोपताना नीट झोपत नाहीत, झोपतानाही प्रत्येकाला वेगवेगळ्या सवयी असतात. मग फक्त एका अंगाला झोपणं असो किंवा पूर्णवेळ पालथं म्हणजेच पोटावर झोपणं असो.
भरपूर लोकं पोटावर झोपत असतात. पण तुम्हाला माहितीये का की, पोटावर झोपल्याने अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात.
जे लोक नेहमी पोटावर झोपतात त्यांना सतत पोटदुखी, अपचन, कफ होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या का होतात?
कारण आपण पालथं झोपल्याने आपल्या पोटावर दबाव पडतो त्यामुळे अन्न पचन नीट होत नाही. मग अशा समस्यांचा सामना करावा लागतो.
जे लोक जास्त वेळ पोटाच्या बाजूने झोपतात त्यांना कंबरदुखी सारखं दुखणं ही होऊ शकतं.
डोकं जड सुद्धा होतं. कारण जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठतात त्यावेळी तुमचं डोकं जड झालेले असतं ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होतो.
पोटावर झोपल्यामुळे भरपूर लोकांना शरीरात वात येण्याची समस्या निर्माण होते.
वात आल्यानंतर शरीरातील एखादा अवयव जोरात दुखायला लागतो. लोकांना ही समस्या नेहमी होताना दिसते, त्यामुळे पोटावर झोपू नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.