कार्तिक पुजारी
शहराबरोबरच काही ग्रामीण भागात एअर कंडिशनिंगचा (AC) वापर वाढला आहे
अनेकजण रात्री झोपताना AC लावून झोपतात. त्यामुळे AC लावून झोपणं शरीरासाठी धोकादायक असतं का? हे जाणून घेऊया
AC च्या हवेत झोपण्याचे अनेक तोटे आहे. यामुळे श्वसनासंबंधी अडचणी निर्माण होऊ शकतात. अस्थमा असणाऱ्यांसाठी हे जास्त हानीकारक आहे
AC च्या हवेत झोपल्यामुळे त्वचा आणि डोळे कोरडे होतात. त्यामुळे त्वचेसंबंधी आजार निर्माण होतात
AC मध्ये जास्त काळ झोपल्यामुळे स्नायु आकडतात येते. त्यामुळे सांधे दुखी वाढते
AC मध्ये जास्त काळ वेळ घालवल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होते. शिवाय, यामुळे एखाद्याला बॅक्टेरियल इंफेक्शन होण्याची शक्यता वाढते.
काही लोकांना अॅलर्जीचा देखील त्रास निर्माण होऊ शकतो.