सकाळ डिजिटल टीम
अल्पावधीत रसिक मनावर आपली छाप सोडणारी एक उत्तम अभिनेत्री स्मिता पाटीलने अवघ्या ३१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात स्मिता पाटील यांचा जन्म झाला
स्मिता पाटील ही महाराष्ट्राचे माजी मंत्री शिवाजीराव पाटील यांची मुलगी होती. तरीसुद्धा एक अभिनेत्री म्हणून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली.
16 व्या वर्षी त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली होती.
चित्रपटात नशीब अजमावल्यानंतर तिला यश मिळाले आणि करीअर अगदी पिकवर असताना तिने अभिनेता राज बब्बरशी लग्न केले.
वयाच्या 31 व्या वर्षी 28 नोव्हेंबर 1986 रोजी स्मिताने एका मुलाला जन्म दिला. मात्र प्रतिकच्या जन्माच्या अवघ्या 15 दिवसांतच स्मिताचं निधन झालं
मुलगा प्रतिकला घरी आणल्यानंतर स्मिताला वारंवार ताप येत होता. बाळाकडे दुर्लक्ष नको व्हायला, म्हणून स्मिताने स्वतःच्या तबियतीकडे फारसे लक्ष दिले नाही.
व्हायरल इन्फेक्शनमुळे स्मिता यांच्या मेंदूला संसर्ग झाला होता.त्या नंतर त्यांचा एक-एक अवयव निकामी होत गेला.
अखेर 13 डिसेंबरच्या मध्यरात्री स्मिताने जगाचा निरोप घेतला.
स्मिता कायम स्वतःला अल्पायुषी असल्याचे सांगायची.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.