Anuradha Vipat
अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.
ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
ट्विंकल खन्ना काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे.
नुकताचं ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये हातात चहाचा कप घेऊन गंभीर विचार करताना ट्विंकल खन्ना दिसत आहे
या व्हिडीओला ट्विंकल खन्नाने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी 50 वर्षांची झाली आहे. पण मी पॅनिक होत आहे.
मी काय पेरीमेनोपोज क्लबमध्ये सहभागी होणार आहे का? तुम्ही लोक मला मेनोपोज टप्प्यातील तुमचा अनुभव शेअर करा, तुमचेही पीरियड्स मिस झाल्यावर तुमच्याही मनात असेच विचार येतात का? असेही ट्विंकल खन्नाने म्हटले आहे.