Anuradha Vipat
दिलजीत दोसांझने पंजाबीबरोबरच हिंदी सिनेमांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.
दिलजीत दोसांझच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सर्वांनाच माहित आहे, पण तो आपलं वैयक्तिक आयुष्य खूप खासगी ठेवतो.
या ४० वर्षीय दिलजीतबद्दल एकदा कियारा अडवाणीने खुलासा केला होता. तिने केलेल्या विधानाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
दिलजीतने आपल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की तो आपल्या कुटुंबाला प्रसिद्धीझोतापासून जाणीवपूर्वक दूर ठेवतो.
कारण त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबाला ट्रोलिंगचा सामना करावा लागू नये, अशी त्याची इच्छा आहे.
रिपोर्ट्सनुसार, दिलजीत विवाहित असून त्याची पत्नी आणि मुलगा दोघेही अमेरिकेत राहतात.