Anuradha Vipat
अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
पण अनेकदा तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. याच ट्रोलिंमबद्दल तिने पोस्ट करून नाराजी व्यक्त केली आहे.
अमृताने फेसबुकवर पोस्ट लिहून घाणेरड्या कमेंट्स व ट्रोलिंगबाबत तिचं मत मांडलं आहे.
अमृता म्हणाली काही दिवस नवीन कामाच्या निमित्ताने मी वेगवेगळ्या मुलाखती देत आहे. आता ह्या क्षेत्रात असल्यामुळे कधीतरी चांगलं कधीतरी वाईट हे ऐकण्याची सवय झालीच आहे… पण ट्रोलिंगच्या नावाखाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या गोष्टी प्रेक्षक बोलतात की लाज वाटते.
पुढे अमृता म्हणाली एका स्त्रीच्या प्रत्येक गोष्टीवर किती बोलायचं? आणि त्याला काही सीमा का नाहीये? मज्जा वाटते तुम्हाला? मला असं वाटतं तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे
अमृताच्या या पोस्टवर काही चाहत्यांनी कमेंट्स करून तिला अशा लोकांकडे दुर्लक्ष करण्यास सांगितलं आहे.