Anuradha Vipat
गुरमीत चाैधरीने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
गुरमीत चाैधरी हा कायमच आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतो.
तब्बल 14 वर्षांपासून गुरमीत चाैधरी अजिबातच समोसा खात नाही. याबाबतचा खुलासा त्यानेच केला आहे.
गुरमीत चाैधरीने शर्टलेस फोटो शेअर केला आहे. यात तो म्हणाला की, मी 14 वर्षांपासून एकही समोसा खाल्ला नाहीये. मला समोसा खूप जास्त खायला आवडतो.
पुढे तो म्हणाला आहे की,बॉडी तयार करण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात. दररोज शूटिंग सुरू असते. परंतू काहीही झाले तरीही मी कधीच वर्कआऊट करणे सोडत नाही.
आता गुरमीत चाैधरीची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.