Anuradha Vipat
हनी सिंहची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
आता हनी सिंहने नुकताच एका अत्यंत मोठा आणि हैराण करणारा खुलासा केला आहे
गेल्या काही दिवसांपासून हनी सिंह भारतामध्ये फार कमी राहतो.
याचे कारण हनी सिंहने सांगितले आहे. हनी सिंह म्हणाला की, मागच्या वर्षी माझ्या मॅनेजरला एक फोन आला.
हनी सिंह म्हणाला की, तो फोन सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या गॅंगचा होता.
हनी सिंह म्हणाला की, त्यांनी मला थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांच्याकडून पैशांचीही मागणी करण्यात आली आहे .
आता आपले आयुष्य जिम, घर आणि स्टुडिओपर्यंतच राहिल्याचे हनी सिंहने म्हटले