Anuradha Vipat
‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका नेहमी टॉप ६ मध्ये असते.
यामध्ये अभिनेता जय दुधाणे महत्त्वाची भूमिका साकारत होता.
परंतु काही कारणास्तव त्याने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे.
जयने यासंदर्भात पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
जय पोस्ट शेअर करत लिहितो आहे की, गेल्या महिन्यात माझ्या वडिलांचं निधन झालं. हा माझ्यासाठी व माझ्या कुटुंबीयांसाठी सर्वात मोठा धक्का होता… त्यांच्या जाण्याने आमचं खूप नुकसान झालं आहे.
पुढे तो म्हणाला की, याशिवाय अनेक वैयक्तिक कारणांमुळे मी ‘स्टार प्रवाह’च्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेचा निरोप घेत आहे.