Anuradha Vipat
अभिनेता गोविंदाची भाची रागिनी खन्ना आता जोरदार चर्चेत आहे.
नुकतीच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट लिहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता
रागिनीने एक दिवस आधी लिहिलेल्या पोस्टमध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारत असल्याचं सांगत सर्वांना चकीत केलं होतं
इन्स्टाग्रामवर धर्म परिवर्तनाची पोस्ट शेअर करत तिने म्हटलं होतं की आता ती यापुढे ख्रिश्चन धर्माचं पालन करणार आहे.
मात्र या पोस्टला 24 तास पूर्ण होण्याआदीच तिने ती डिलिट करत नेटकऱ्यांची माफी मागितली आहे.
मी माझ्या धर्म परिवर्तनच्या पोस्टसाठी माफी मागते असं लिहित एका हिंदू धर्मगुरूंच्या भाषणाचा व्हिडीओ तिने स्वत:च्या फोटोसोबत शेअर केला आहे.