Anuradha Vipat
बॉलिवूडची ‘मस्त गर्ल’ अभिनेत्री रवीना टंडन हिने 90 च्या दशकात बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
आज रवीना टंडन बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
एक काळ असा आला होता जेव्हा बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्री रवीनाला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला
एवढंच नाही तर, रवीनाने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासाठी देखील पुढाकार घेतला होता.
एका मुलाखतीत रवीना म्हणाली, तेव्हा अशी वेळ होती जेव्हा माझ्या शरीरामुळे माझ्यावर निशाणा साधण्यात आला. बॉडी शेमिंगला मी बळी पडली होती. त्यामुळे मी स्वतःला कॅमेऱ्यापासून दूर ठेवणं योग्य समजलं
‘आई झाल्यानंतर ऐश्वर्या हिला देखील बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला असंही मुलाखतीत रविना म्हणाली