Anuradha Vipat
पूजा देओल नेहमीच लाइमलाइटपासून दूरच राहणं पसंत करते.
आता पुन्हा एकदा पूजा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे करणने सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो.
आईसोबतचा खास फोटो पोस्ट करत करणने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कॅमेरापासून दूर राहणं, प्रकाशझोतात न येणं हा आई प्रकाश कौर आणि पत्नी पूजा देओल यांचा व्यक्तीगत निर्णय होता असं सनी देओलने म्हटलं होतं.
दिलेल्या मुलाखतीत सनी म्हणाला, माझी आई किंवा माझ्या पत्नीला कधीच लाइमलाइटपासून दूर राहण्याची बळजबरी केली नव्हती.
माझ्या पत्नीचं स्वत:तं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. आपले निर्णय स्वत:च घेण्याचं स्वातंत्र्य तिला नेहमीच आहे असंही सनी म्हणाला आहे
सनी आणि पूजा हे गेल्या 40 वर्षांपासून एकत्र आहेत.