Anuradha Vipat
बॅकग्राउंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या उषा नाईक यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
जवळपास २ दशकांहून अधिक काळ उषा नाईक इंडस्ट्रीत सक्रिय आहेत
काही दिवसांपूर्वी त्यांना ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उषा नाईक यांनी आपल्या लेकाला या इंडस्ट्रीपासून का दूर ठेवलं? यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
उषा नाईक म्हणाल्या, “मी मुलासाठी कधी ब्रेक घेतला नाही. माझ्या मुलाला मी इंडस्ट्रीत कधीच आणलं नाही. कारण मी लहानपणापासून इतके अपमान, इतका त्रास सहन केला आहे. त्यामुळे मी माझ्या मुलाला इंडस्ट्रीच्या सावलीला देखील आणलं नाही.
सध्या उषा नाईक वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात